Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीशाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर

शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर

आजचा पैसा उद्या पाहायचा नाही, आजची लावणी उद्या गायची नाही, या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर येत आहे. आपल्या हयातीत दोन लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या या शाहीराची सांगीतिक यशोगाथा मोठ्या पडद्यावर उतरवण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक मिलिंद कृष्णा सकपाळ यांनी पेलले आहे. कांतीलाल भोसले, निलेश बबनराव देशमुख, रोहन अरविंद गोडांबे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘द मॉर्निंगस्टार फिल्म कंपनी’ ‘असमथी प्रोडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे.

प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या “महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव” आणि “पठ्ठे बापूरावांच्या शोधात” या पुस्तकांवर आधारित चित्रपटाची कथा-पटकथा राहुल डोरले यांची आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखनीतून गीते शब्दबद्ध केली जाणार आहेत. छायांकन केको नाकाहारा यांचे आहे. प्रोडक्शन डिझायनर संतोष फुटाणे तर मेकअप अँड हेअर डिझायनर विक्रम गायकवाड आहेत. कॉस्ट्यूम डिझायनर सचिन लोवलेकर तर साउंड डिझायनरची जबाबदारी मंदार कमलापूरकर सांभाळणार आहेत. सुपर वाइजिंग प्रोड्युसर भास्कर पावस्कर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -