Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीप्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनांना चालना द्यावी

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनांना चालना द्यावी

अहमदनगर- केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशभर नागरिकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विविध योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे.परंतु स्थानिक पातळीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या कामात विविध अडचणी निर्माण होत आहे.या अडचणी सोडविण्यासाठी १८ जानेवारी रोजी पदाधिकारी अधिकारी व ठेकेदारां ची संयुक्त बैठकीच्या योजना अहमदनगर महापालिकेत करण्यात आली असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.

शहरी गृहनिर्माण व व्यवहार मंत्रालय,मुंबई यांच्या आदेशान्वये आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,मुंबई यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरीता सर्व नगरसेवकांसाठी ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४ घटक असुन यामध्ये प्रामुख्याने एएचपी,बीएलसी,आयएसएसआर,रमाई योजनेचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्या साठी व त्यांना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी याकरीता हे प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत होणारी कामे व त्याचा फायदा व मिळणारी सवलत याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.पंत प्रधान आवास योजना सन २०१५ मध्ये सुरु झाली असुन अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केडगांव व नालेगाव येथे योजना राबविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणामध्ये महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की,या पुर्वी महानगरपालिके मार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेबाबत आलेल्या अनुभवातुन यापुढील योजना नागरिकांना सर्वसुविधा मिळतील अशा प्रकारे चांगल्या पध्दतीने राबवाव्यात.यावेळेस उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता व या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरता १८ जानेवारी रोजी महानगरपालिकेचे पदाधिकारी,अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या समवेत मिटिंगचे आयोजन करण्यात यावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -