Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीVastu Tips : नविन घर बांधायचा आहे तर याचा विचार नक्की करा,...

Vastu Tips : नविन घर बांधायचा आहे तर याचा विचार नक्की करा, नाहीतर नंतर होईल पश्चाताप!

वास्तुशास्त्र (Vastu Shastra – Architecture)  हे वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागात करावयाच्या रचनांचे उत्तम शास्त्र आहे. वास्तुशास्त्राचा उपयोग हा संपूर्ण मानवजातीच्या फायद्यासाठी आहे.

वास्तुशास्त्र दोन शब्दांनी वास्तु आणि शास्त्र अशी बनलेली आहे जिथे, वास्तु म्हणजे इमारतीचा/जागेचा पाया आणि शास्त्र म्हणजे कला, खगोलशास्त्र आणि ज्योतिष यांना जोडणारा विज्ञानाचा अभ्यास. अनेक विद्वान वास्तूतज्ञांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

यात दिशा, मृदा म्हणजे माती परीक्षण, वास्तु परीक्षण असे प्रकार येतात. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत ही फ्लॅट आणि बंगला पद्धतीमध्ये हे करणे शक्य नसले तरी वास्तुशास्त्रामधील सूचनांचा योग्य तेथे पालन केल्यास ते नक्कीच लाभदायक ठरते व तसे अनेक अनुभव अनेकांनी सांगितलेले आहेत. तसेच नियमांचे पालन करून जर वास्तु सज्ज केली आणि तसे राहणीमान ठेवले तर ते कुटूंबाला लाभदायक ठरते.

Shani has a close relationship with Vastuएखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीत शनी कोणत्याही स्थानी असेल व तेव्हा त्या व्यक्तीने नवीन घर बांधण्यास सुरुवात केली तर त्या त्या स्थानातील शनी त्या व्यक्तीला तीन ते अठरा वर्षात शुभ-अशुभ फल देतो. त्याविषयी वास्तू व शनीचा संबंध व उपाययोजना काय आहेत याचे महत्व जाणून घ्या.

शनीचा वास्तूशी असतो घनिष्ठ संबंध

१) वास्तू बांधताना त्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या (लग्न) स्थानात शनी असेल तर सातवे व दहावे स्थान रिकामे असेल तर शनी वास्तुसौख्य देतो.

२) दुसऱ्या स्थानात शनी असेल तर वास्तू बांधत असताना बांधकाम मध्येच थांबेल, असे करु नये. जशी जमेल तशी वास्तू बांधून घ्यावी. असे केल्यास हा शनी शुभ फल देतो.

३) तिसऱ्या स्थानात शनी असेल तर घर बांधून झाल्यानंतर त्या व्यक्तीने घरात तीन कुत्र्यांना पाळावे. त्यामुळे शनीची फळे शुभ मिळतात.

४) जर जन्मकुंडलीत चौथ्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने स्वतःचे घर बांधू नये. शनीपालट होईपर्यंत भाड्याच्या घरात राहावे, कारण घर बांधलेच तर आई, आजी, सासू व मामा या चारही जणांना त्रास होण्याची शक्यता असते.

५) पाचव्या स्थानात शनी असल्यास एखाद्या व्यक्तीने घर बांधायला घेतले तर त्याच्या मुलाला त्रास होतो. परंतु मुलाकडून नवीन वास्तू बांधून घेण्यास काही हरकत नाही. जर घर बांधायचेच असेल तर अशा व्यक्तीने वयाच्या ४८व्या वर्षानंतर घर बांधावे. परंतु घर बांधतांना पाया खोदण्यापूर्वी शनीचे वाहन रेडा असून त्याचे पूजन करावे.

६) सहाव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने वयाच्या ३६ अथवा ३९व्या वर्षी नवीन घर बांधावे. तत्पूर्वी घर बांधले तर त्याच्या मुलीला सासरी त्रास होतो.

७) कुंडलीत सातव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तुसुख चांगले मिळते. बनविलेले चांगले घरही सहज मिळते. परंतु याच स्थानात शनी अशुभ असल्यास घर विकावे लागते.

८) आठव्या स्थानात शनी असेल तर नवीन घर बांधताना अगदी सुरुवात करण्यापासून ते घर पूर्ण होईपर्यंत अनेक अडचणी व अडथळे निर्माण होतात. परंतु याच स्थानात राहू व केतू शुभ असतील तर मात्र वास्तूविषयक शुभ फळे मिळतात.

९) नवव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने घर तेव्हाच बांधण्यास सुरुवात करावी की जेव्हा त्याची माता वा त्याची पत्नी गर्भवती असेल, तसेच स्वत:चे धन व त्यात थोडे वडिलांचे धन, असे एकत्र करुनच घर बांधावे.

१०) दहाव्या स्थानात शनी असल्यास नविन घर बांधण्यास सुरुवात करु नये, कारण यावेळी घर बांधल्यास कोणतेही लाभ होत नाही. कदाचित घरही अर्धवट स्थितीत राहते. बांधकाम पूर्ण होत नाही.

११) अकराव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तु सौख्य उशिरा मिळते. वयाच्या ५५व्या वर्षानंतर घर बांधण्याचा योग येतो. फक्त घराचे मुख्य दरवाजे दक्षिणेला येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसे न केल्यास घरात दीर्घमुदतीचे आजार होतात.

१२) बाराव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने शक्यतो चौरसाकृती घर बांधावे. कारण तेच घर त्याला विशेष लाभदायक असते. तसेच फारसे कष्ट न पडता घर बांधून होते.

विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि शक्य असेल तर याचा अवलंब करा व आपले नुकसान टाळा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -