Friday, April 26, 2024
Homeक्रीडाFIFA World Cup : स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी

FIFA World Cup : स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी

फिफा विश्वचषकातील पराभव जिव्हारी

मॅड्रीड (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA World Cup) बाद फेरीतून संघाला गाशा गुंडाळावा लागल्याने स्पेनच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. या पराभवानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

स्पेनने त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून फिफा स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. परंतु त्यांनी शेवटचा गट सामना गमावला. सुपर १६ च्या फेरीत मोरोक्कोकडून पेनल्टीवर पराभूत होत स्पेनचे आव्हान संपुष्टात आले.

स्पेनच्या फुटबॉल फेडरेशन आरएफईएफने अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. एनरिकच्या जागी, २१ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक, लुईस दे ला फुएन्टे हे सध्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असतील. स्पेनच्या राष्ट्रीय संघाच्या भविष्यासाठी नवीन प्रकल्पावर काम करावे लागणार असून त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही अधिकृत निवेदनात म्हटले आहे. वृत्तानुसार, महासंघाच्या अंतर्गत बैठकीत एनरिक यांनी स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

यावेळी चाहत्यांना २०१० मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाकडून मोठ्या आशा होत्या. या संघाने ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यात कोस्टा रिकाचा ७-० असा पराभव करून आपली दावेदारी मजबूत केली. पण दुसऱ्या सामन्यात जर्मनीसोबत बरोबरी साधली. तर ग्रुप स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात जपानने स्पेनला हरवून चकित केले. स्पेनच्या संघाला कोस्टा रिकाविरुद्ध केलेल्या ७ गोलमुळे चांगल्या गोल फरकाच्या आधारे अंतिम-१६ मध्ये स्थान मिळाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -