Tuesday, May 7, 2024
Homeमहत्वाची बातमीBEST Premium bus : ठाणे-बीकेसी मार्गावर आता ‘चलो बस’

BEST Premium bus : ठाणे-बीकेसी मार्गावर आता ‘चलो बस’

बेस्टची पहिली प्रीमियम बस सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली बेस्टची पहिली प्रीमियम बससेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ठाणे ते बीकेसी मार्गावर बेस्टची ही पहिली प्रीमियम बस (BEST Premium bus) सेवा सुरू होत आहे.

यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४ प्रीमियम बसेस दाखल झाल्या असून सोमवारपासून त्या ठाणे ते बीकेसी व वांद्रे स्थानक ते बीकेसी दरम्यान धावणार आहेत. ही बससेवा ‘चलो बस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

ही बससेवा सुरू झाल्यामुळे देशात इलेक्ट्रिक प्रीमियम बस सुरू करणारी बेस्ट ही पहिली संस्था ठरणार आहे. या बससेवेचे आरक्षण चलो अॅप वरून आपल्या घरात बसून करता येणार आहे. या बससेवेसाठी वांद्रे स्थानक ते बीकेसी दरम्यान तिकीट दर ५० रुपये असेल, तर ठाणे ते बीकेसी दरम्यान २०५ रुपये भाडे अॅप वरून आकारण्यात येईल.

नव्याने चलो अॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांना ठाणे – बीकेसी दरम्यान पहिल्या पाच फेऱ्या १०० रुपयांत प्रवास करता येणार असून वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या ५ फेऱ्यांचा प्रवास १० रुपयांत करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रवासी ज्या ठिकाणांहून तिकीट बुक करणार त्या ठिकाणांहून प्रवाशाला प्रवास करता येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रीमियम लक्झरी बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. तसेच ज्या ठिकाणी प्रवासी उभा असेल तेथेच बस थांबेल. त्यामुळे प्रवाशांना जलद बसप्रवासाचा नवीन मार्ग उपलबध होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -