Friday, April 26, 2024
Homeदेशकाँग्रेस कात टाकणार!

काँग्रेस कात टाकणार!

नवी दिल्ली : अध्यक्ष बनल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील ५० टक्के पदं ही ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली. उदयपुर येथील अधिवेशनात पक्षाची ५० टक्के पदं ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना देण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करणार असल्याचे खरगे यांनी यावेळी म्हटले.

काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली असून काँग्रेसला २४ वर्षांनंतर बिगर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलताना खरगे यांनी मोदी सरकावर टीका केली. तसेच, भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, पण त्यांनाही माहिती आहे, ते शक्य नाही. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही, असे म्हणत नवनियुक्त अध्यक्षांनी मोदी सरकारला आव्हानच दिले.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या दिल्ली येथील मुख्यालयात निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी विजयाचे प्रमाणपत्र खरगे यांना दिले.

आज माझ्यासाठी अतिशय भावूक क्षण आहे, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. खोटे आणि तिरस्काराचे बंधन काँग्रेस तोडेल. केवळ पक्षासाठी नाही, तर लोकशाही वाचविण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज असल्याचेही खरगे यांनी म्हटले.

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगेंनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पुष्पबुके देऊन त्यांचे स्वागत केले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम काँग्रेस मुख्यालयात झाला. यावेळी पक्षाच्या दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे औपचारिकपणे काँग्रेसची जबाबदारी सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना पक्षापुढील आव्हानांवर चर्चा केली आणि नवीन अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी खर्गे यांनी सोनिया गांधींच्या एका विधानाशी फारकत घेत, असे घडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -