Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीनाना पटोले होणार का मुख्यमंत्री? बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण

नाना पटोले होणार का मुख्यमंत्री? बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण

शेवटी सगळं आमदारांच्या संख्येवर अवलंबून : अजित पवार

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ५ जूनला असलेल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बॅनरबाजी करण्यात आली. यात पटोलेंचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला. काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी पटोलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे तर शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे नागपुरात बॅनर्स लागले होते. आता काँग्रेसकडून नाना पटोलेंचं नाव पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन उमेदवार भावी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. केवळ नागपूरच नव्हे तर गेल्या आठवड्यात कल्याण व आता भंडारा अशा ठिकाणीही पटोलेंच्या समर्थकांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत बॅनरबाजी केली होती.

काय म्हणाले अजित पवार?

दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या बॅनरबाजीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यासाठी १४५ हा जादुई आकडा उभा करावा लागतो. अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यामुळे ते पोस्टर लावतात, पण शेवटी सगळं आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं, असं अजित पवार म्हणाले.

यावर नाना पटोलेंनी सौम्य शब्दांत प्रतिक्रिया दिली. “हा कार्यकर्त्यांचा एक प्रकारे उत्साह असतो. पण विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे अशा पोस्टरची गरज नाही आणि असे पोस्टर लावूही नयेत, अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करेन”, असं नाना पटोले म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -