Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीNashi News : व्हॉईस ऑफ मीडिया नाशिकची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Nashi News : व्हॉईस ऑफ मीडिया नाशिकची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

विविध विंगच्या शिलेदारांचीही लवकरच निवड; नाशिकमध्ये होणार उत्तर महाराष्ट्राचा मेळावा

नाशिक : देशातील आणि राज्यातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’वर काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची नाशिकची नूतन जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उत्तर महाराष्ट्र पालक सचिव दिगंबर महाले यांनी घोषीत केली.

ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत ही नाशिक कार्यकारणी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष कुमार कडलग दै. प्रहार, पत्रकार हल्ला विरोधी फोरम जिल्हाध्यक्ष भगवान पगारे दूरदर्शन पी टी आय, कार्याध्यक्ष डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर, दै. गावकरी, उपाध्यक्ष ब्रिजकुमार परिहार संपादक सर्वस्पर्शी, कार्याध्यक्ष दिलीप साळुंखे दैनिक लक्ष महाराष्ट्र ,नाशिक उपाध्यक्ष देविदास बैरागी दै. सामना, उपाध्यक्ष तुषार देसले म. टा., सरचिटणीस देवानंद बैरागी नवराष्ट्र, सह सरचिटणीस अविनाश शिंदे पुढारी,खजिनदार वकार खान महाराष्ट्र टाइम्स, कार्यवाह रश्मी मारवाडी दै. प्रहार, कार्यवाहक सुनीता पाटील स्टार २४ न्यूज चॅनेल, संघटक भगवान थोरात संपादक साप्ताहिक लालदिवा न्युज पोर्टल, संघटक ज्ञानेश्वर तुपसुंदर पी टी आय, दै. मीडिया वार्ता,
संघटक आझाद आव्हाड सहारा समय,
संघटक प्रकाश पगारे पुण्यनगरी,
प्रवक्ता प्रमोद दंडगव्हाळ दै. सकाळ,
प्रसिद्धी प्रमुख संदिप धात्रक ऑनलाईन न्यूज पोर्टल,
सदस्य तुषार बर्डे सप्तश्रुंगी गड, पुढारी
सदस्य लक्ष्मण सोनवणे दै. प्रहार,
सदस्य हर्षद गद्रे लोकमत,
सदस्य अफजल पठाण गांवकरी,
सदस्य :मयुरी जाधव डिजिटल मीडिया,
सदस्य प्रिया जैन रेडिओ विश्वास, सदस्य विजय धारणे नाशिक न्यूज यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सर्वांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेत सहभागी होऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक, कुटुंबाच्या आरोग्यविषयक, आपल्या परिस्थितीजन्य दर्जेदार प्रशिक्षण, पत्रकारांची घरे व सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ या पंचसूत्रीवर काम करणाऱ्या या पत्रकार संघटनेत सहभागी व्हावे. असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच नाशिक महानगर कार्यकारिणीचे गठन करण्यात येणार असून व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा समन्वयक डिजिटल विंग, जिल्हा समन्वयक साप्ताहिक विंग, जिल्हा समन्वयक दोन, शैक्षणिक मदत कक्ष, जिल्हा समन्वयक आरोग्य कक्ष,महिला जिल्हाध्यक्ष विविध विंगच्या पदांचीही लवकरच घोषणा होणार असल्याचे व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी सांगितले. दोरकर म्हणाले नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज्य आणि विभागीय पातळीवर संधी देण्यात आलेली आहे. दर तीन वर्षाला नवीन पदाधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी काम करण्याची संधी देण्यात येते.त्याप्रमाणे हे बदल केले असल्याचेही नाना दोरकर यांनी सांगितले .नवीन सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि उत्तर महाराष्ट्राचा मेळावा लवकरच नाशिकमध्ये होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष कुमार कडलग यांनी सांगितले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या केंद्र, आणि राज्य कार्यकारिणीच्या वतीने नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -