Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीSiddu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी नव्या बाळाचे आगमन! चरण-बलकौर पुन्हा एकदा...

Siddu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी नव्या बाळाचे आगमन! चरण-बलकौर पुन्हा एकदा बनले आईबाबा

बलकौर सिंह यांनी शेअर केला बाळासोबतचा फोटो

चंदीगढ : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) सिद्धू मुसेवालाची (Siddu Moosewala) आई चरण कौर सिंह (Charan Kaur Singh) गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक वृत्तसंस्थांनी तशी बातमीही दिली होती. मात्र, काहीच दिवसांपूर्वी सिद्धूचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी ही अफवा असल्याचे सांगत लवकरच आम्ही जे काही असेल ते तुम्हा सर्वांसोबत शेअर करु असे म्हटले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी सिद्धूच्या सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मुसेवाला घराण्याला आता नवा वारस मिळाला आहे. सिद्धूच्या आईबाबांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या (IVF Technology) मदतीने बाळाला जन्म दिला आहे.

वयाच्या ५८ व्या वर्षी चरण सिंह कौर पुन्हा एकदा आई झाल्या आहेत. सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. ऐन उमेदीच्या काळात सिद्धूच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला होता. त्याचे आईवडील अत्यंत एकटे पडले होते. त्यामुळे त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा आईबाबा होण्याचा निर्णय घेतला.

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळदेखील दिसत आहे. बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत त्यांनी पंजाबीमध्ये लिहिलं आहे,”शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने आज त्याच्या धाकट्या भावाचं स्वागत करत आहोत. देवाच्या आशीर्वादाने बाळ सुखरुप आहे. सर्व हितचिंतकांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे”.

सोशल मीडियावर आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -