Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीVasai-Virar housing scam : वसई-विरार घर घोटाळ्यात कर्ज देणाऱ्या बँका व पतपेढ्या...

Vasai-Virar housing scam : वसई-विरार घर घोटाळ्यात कर्ज देणाऱ्या बँका व पतपेढ्या अडचणीत?

वसई : वसई-विरारमधील ५५ अनधिकृत इमारतींचा घर घोटाळा (Vasai-Virar housing scam) उघडकीस येण्यास ज्या इमारतीपासून सुरुवात झाली त्या ‘रुद्रांश’ इमारतीला तब्बल १३ हून अधिक बँका आणि पतसंस्थांनी इमारत बांधण्यासाठी आणि फ्लॅट घेण्यासाठी कर्ज दिले आहे. या कर्ज देणाऱ्या १३ बँका आता पोलिसांच्या रडारवर आल्या असून त्यांनी कर्ज देताना इमारतीचा कायदेशीर बाबींची पडताळणी केली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दिशेने आता पोलीस तपास करणार असल्याने या बँकेतील अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

वसई-विरार मधील ५५ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी विरार पोलिसांनी ऑगस्ट २०२३च्या पहिल्या आठवड्यात तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला.

या घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत पाटीलसह त्याच्या ४ साथीदारांना पोलिसांनी अटक केली. या पाच जणांच्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई-विरार, नालासोपारामध्ये अनेक अनधिकृत इमारती बांधल्या. त्याचप्रमाणे इतर विकासकांनाही बनावट कागदपत्रे पुरवली. याप्रकरणी वसई-विरारच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३६ हुन अधिक गुन्ह्यांची नोंद केली आहे.

या प्रकरणी पालिका अधिका-यांसह या बेकायदेशीर इमारतींना कर्जे पुरविणाऱ्या बँका व पतपेढ्यांमधील अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -