Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीविरार-डहाणू रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी

विरार-डहाणू रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी

गर्दीच्या वेळेला प्रवाशांची रखडपट्टी

विरार : सकाळ – संध्याकाळ गर्दीच्या वेळेला पालघर, बोईसर, डहाणू येथे जाणाऱ्या विरार भागातील गरजू नागरिकांची व चाकरमान्यांची रोज वेळेवर गाड्या नसल्याने रखडपट्टी होत आहे. तर काही बांधकाम व्यावसायिक, वकील यांना ट्रेनचा प्रवास टाळून स्वत:च्या खासगी वाहनांनी मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून लांबचा वळसा घालून पेट्रोल व जादा खर्च करून यावे-जावे लागत आहे.

लोकल ट्रेनला कमालीची गर्दी असते. जाण्यासाठी सकाळी व संध्याकाळी कमीत कमी एक तासाहून अधिक वेळ ट्रेनसाठी थांबावे लागते. गाडीत सामान्य कष्टकरी व मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच गर्दी असते. इतर अधून-मधून जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढणे देखील मुश्किल होते. गाडीचे टाईमटेबल फिक्स नाही. मुख्य म्हणजे रोज कामधंद्याची धावपळ असणाऱ्या नागरिकांना लोकल मेमू व एक्स्प्रेस गाड्यांनी सकाळ – संध्याकाळ गर्दीच्या वेळी प्रवास करावा लागतो. अशावेळी लोकल ट्रेनचे तिकीट एक्स्प्रेस गाडीला चालत नाही. एक्स्प्रेसचे तिकीट वेगळे काढावे लागते.

खासगी वाहनाने बोईसर, पालघर येथून वसई – विरारला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खड्डे पडलेले रस्ते व मुंबई – अहमदाबाद महामार्ग असलेल्या नादुरुस्त रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. आता रस्ते बिघडल्याने अनियमित लोकल ट्रेन व एक्स्प्रेस गाड्यांची सेवा रेल्वेने अधिक देऊन स्थानिक प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -