Wednesday, May 1, 2024
Homeक्राईमठाण्यात ऑनलाईन फ्रॉड करणारे तिघे अटकेत

ठाण्यात ऑनलाईन फ्रॉड करणारे तिघे अटकेत

स्वस्त कपड्यांच्या जाहिरातीतून फसवणुकीचा प्रकार

ठाणे : इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वस्तात कपड्यांची जाहीरात करुन ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत सुमारे १२०० जणांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या तिघांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी सुफीयान शफीक खान (२३) रा. जास्मीन पार्क मुंब्रा, फुरकान रिजवान खान (२०) रा. मुंब्रा आणि कामरान इस्माईल शेख (१९) रा. चारमीनार लॉन्स जवळ, मुंब्रा यांना अटक करण्यात आले आहे. २० मार्च रोजी मुंब्रा येथील एका व्यक्तीने परिमंडळ १ ठाणे कार्यालयात येऊन माहिती दिली होती. त्यानुसार काही इसम हे मागील दोन ते अडीच वर्षांपासून फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून त्याद्वारे कपड्यांची जाहीरात करीत आहेत. त्यांचे अकाऊंट वरील स्टेटस पाहिले असता ते ग्राहकांना कपडे आवडल्यास इन्स्टाग्रामवरील व्हॉट्सअॅप लिंक वर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास ते तत्काळ प्रतिउत्तर देतात व त्यांच्याकडे मेसेजद्वारे त्याचे पूर्ण माहिती मागवतात. त्यामध्ये ‘नो कॅश ऑन डिलीव्हरी’ असे नमूद करून पुढील ७ ते १२ दिवसात बुकिंग केलेला माल न मिळाल्यास पैसे परत केले जातील, असे लिहून मेसेज फॉरवर्ड करतात. ग्राहक हे पैसे पाठवत होते. परंतु कपडे न मिळाल्याने फोन केल्यावर कोणताच प्रतिसाद मिळत नाही.

या फसवणुकीची माहिती मिळाल्यावर त्यांचे लोकेशन तपासून त्यांच्या मुंब्रा येथील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइलमधील १ हजार ते १२०० नंबर ब्लॉक केल्याचे आढळून आले आहे. या कपडे विक्रीसाठी बँक अकाऊंट दुसऱ्याच व्यक्तीचा दिला जात होता. त्याच्या खात्यातून ते पैसे वळते करत असत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तर ब्लॉक केलेल्या यादीतील एक ग्राहकाकडे विचारणा केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले. तर अशा प्रकारच्या ऑनलाईन अमिषांना बळी पडू नका, असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -