Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीएपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली

एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली

उन्हाचा दाह कमी करणारे रसाळ खरबूज लै भारी !

नवी मुंबई : अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हात गारेगारची अनुभूती देणाऱ्या फळांकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांनी आपला मोर्चा वळवला आहे. एपीएममी मार्केटमध्येही उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. रमजानचे दिवस सुरू असल्याने फळांना मोठी मागणी आहे. उन्हाचा दाह कमी करणाऱ्या फळांपैकी खरबूज हे फळ चविष्ट तर आहेच, त्याचसोबत शरीरासाठीदेखील गुणकारी आहे. वाशीतील एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली असून विविध प्रजाती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सुमारे २ हजार ९५५ किंटल खरबुजांची आवक झाली आहे. युरोपियन कँटालूप म्हणजेच नारंगी, उत्तर अमेरिकन, सारडा, हनीड्यू, पर्शियन, कँडी किस, कॅनिरी आदी प्रकारच्या खरबुजांच्या प्रजाती बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

घाऊक बाजारात २२ ते २५ रुपये प्रतिकिलो किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भारतात दरवर्षी अंदाजे एक ते दोन दशलक्ष टन खरबुजाचे उत्पादन घेतले जाते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब ही राज्ये खरबुजांच्या उत्पादनात देशात अग्रगण्य आहेत. या भागांमध्ये हार मधू, दुर्गापुरा मधू, पुसा शरबरी, अर्का राजहंस, अर्का जीत, पुसा मधुरस आणि पुसा रसराज या प्रजातींच्या खरबुजांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. भारतात कस्तुरी खरबुजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कस्तुरीचे मूळ हे इराण, अनातोलिया आणि अर्मेनिया येथे आहे.

काय आहेत कस्तुरी खरबूजचे फायदे

कस्तुरी खरबूजमध्ये ‘अ’ आणि क जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडतो. त्यात सुमारे ९० टक्के पाणी आणि नऊ टक्के कर्बोदके आढळतात. चवीला गोड असल्याने कस्तुरी खरबूजला महाराष्ट्र तसेच देशभरातून मोठी मागणी असते. खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि ‘क’ जीवनसत्वाचा साठा असल्याने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते. त्याचसोबत अल्सर, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या पोटाशी निगडित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील फायबरयुक्त खरबूज फायदेशीर ठरते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -