Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीतामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा केला होता प्रयत्न

तामिळनाडू : तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ड्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते, खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी खासदार गणेशमूर्ती यांचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खासदार गणेशमूर्ती यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं.  त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. खासदार गणेशमूर्ती यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी मंत्री एस मुथुसामी, भाजप आमदार डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम हे रुग्णालयात पोहोचले होते.

तीन वेळा संसदेत निवडून आलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे निभावली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे, खासदार गणेशमूर्ती यांनी नाराजीचा सुर मारला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -