Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीसुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने विधीमंडळ तापले

सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने विधीमंडळ तापले

सुशांतसिंह प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात तसे संकेत दिले आहेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावाने आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न खासदार शेवाळे यांनी लोकसभेतल्या भाषणादरम्यान उपस्थित केला.

बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए यू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आदित्य-उद्धव असल्याचे खळबळजनक वक्तव्य राहुल शेवाळे यांनी सभागृहात केले. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे.

नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा. ८ जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? सीसीटीव्ही का गायब झाले? विजिटर बूकचे त्या दोन दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

शिवसेनेत झालेल्या बंडात खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळं सध्या ते शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आहेत. आपण आदित्य ठाकरे यांच्यावर कोणताही आरोप केला नसून, एयू म्हणजे नेमकं कोण एवढाच प्रश्न आपण विचारल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -