Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीपश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान विशेष भाडे आकारून सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक) ट्रेन प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि पुढच्या दिवशी सकाळी ९.१० वाजता अजमेर पोहचेल. ही ट्रेन १०,१७, २४ आणि ३१ जानेवारी २०२२ या दिवशी असेल. तर ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.

ही ट्रेन ९, १६, २३ आणि ३० जानेवारी २०२२ या दिवशी असेल. ही ट्रेन प्रवासादरम्यान बोरीवली, वापी, सूरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर और किशनगढ या स्थानकांवर थांबेल.
या रेल्वेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -