Tuesday, August 4, 2026

NCP Workers : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले

NCP Workers : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले

- सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हटल्याने वाद; हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना घोषणाबाजी

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेसने 'गुंगी गुडिया' अशी अत्यंत वादग्रस्त टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मंगळवारी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात घुसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. (NCP Workers)

काँग्रेसच्या 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उल्लेख 'गुंगी गुडिया' (Gungi Gudiya) असा करण्यात आला होता. या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Congress State President Harshvardhan Sapkal) मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते अचानक काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. (NCP Workers)

पत्रकार परिषदेत घुसल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते सूरज चव्हाण (NCP youth leader Suraj Chavan) यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या एक्स पोस्टवरून सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हणून हिणवण्यात आले आहे. एका बाजूला काँग्रेस महिला सन्मानाची आणि 'दुर्गा' बनण्याची भाषा करते, आणि दुसऱ्या बाजूला महिला नेत्याचा असा अनादर करते. ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असून प्रदेशाध्यक्ष या नात्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून जाहीर माफी मागावी. आमचे भांडण संपूर्ण काँग्रेस पक्षाशी नसून, ज्याने ही वादग्रस्त पोस्ट केली आहे त्याच्याविरोधात हे आंदोलन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (NCP Workers)

काँग्रेस नेत्यांचे कान बहिरे :

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या अर्थ खात्यासह इतर महत्त्वाच्या शासकीय आणि राजकीय मुद्द्यांवर बोलत नाहीत, या काँग्रेसच्या आरोपाचाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. वहिनी सर्व प्रश्नांवर उत्तरे देत असून राज्यातील सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. परंतु काँग्रेसचे नेते स्वतःच्या फायद्याची आणि सोयीची विधाने करून बदनामी करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचे कान बहिरे झाल्यामुळे त्यांना उत्तरे ऐकू येत नसतील, असा टोलाही या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने काँग्रेस कार्यालयात काही काळ गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा वाद शांत झाला. (NCP Workers)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >