मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर बोलताना त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला आहे. हा केवळ एका व्यक्तीवर झालेला आघात नसून, स्वकर्तृत्वाने समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत घातक असे 'फेव्हीक्विक' ओतून त्याला जिवे ...
जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत सहन केली जाऊ शकत नाही." राजकारण हे विचारांचे आणि धोरणांचे असावे, महिलांच्या अपमानाचे नव्हे, असे सांगत त्यांनी लोकशाही मूल्यांचे भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अवघ्या अडीच ...
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते केवळ आपल्या आईच्या पाठीशी उभे नसून, स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे आहेत. "राजकारणात सत्ता बदलत राहते, विजय-पराजय होत राहतात; पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा आणि राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे," असे सांगत त्यांनी अशोभनीय विधानांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.






