मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. "पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे. असा अवमान कदापि खपवून घेतला जाणार नाही," असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' टीकेला प्रत्युत्तर मुंबई : विरोधकांना जनतेतून कोणताही ...
"राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान नको" :
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता महाराष्ट्रासमोर आला आहे. राजकीय विरोध जरूर करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करणे ही कोणती संस्कृती आहे? काँग्रेसने निदान जनाची तरी लाज बाळगायला हवी होती."
त्यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर करण्यात आलेली टिप्पणी ही केवळ एका व्यक्तीवरची टीका नसून संपूर्ण महिला शक्तीचा अवमान आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला हा अपमान कधीही विसरणार नाहीत. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा असून अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही.
ठराविक माध्यमकर्मींना धनंजय मुंडे नावाचा कावीळ, त्यांना बीड जिल्ह्यात सलोखा नांदू द्यायचा नाही - मुंडेंची पुन्हा एकदा ...
'२०२४ चा धडा काँग्रेस विसरली का?'
यावेळी शिंदे (Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. "२०२४ मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेसला योग्य उत्तर दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्यांना जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल," असा इशारा त्यांनी दिला.
सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप :
काँग्रेसने (Congress) राजकीय विरोध करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, महिलांचा अवमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असा आरोप करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. सुनेत्रा पवारांवरील टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






