Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण मराठवाडा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत आणखी काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २४ जूनसाठी ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक वाहनांना ५० टक्के टोल मुंबई : सिंधुदुर्ग ...
कोकणात २४ तासांत तीव्र पावसाची शक्यता
कोणकणातील काही भागात पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. पालघरसह काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर रत्नागिरीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) चे नवीन डिजिटल लिलाव ...
पश्चिम महाराष्ट्रातही मान्सूनची हजेरी ?
पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सह सातारमध्ये कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा ...
मराठवाड्यात मान्सूनचे आगमन
मराठवाड्यातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. तर अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ...
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ?
धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.विदर्भात 23 जून रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी उष्णतेची लाट कायम आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत हिट वेव्हचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत १५ निष्पाप ...
राज्यातील पुढच्या काही तासात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पुढील ७२ तास महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर राहील.





