उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबत या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारा ‘सायन्स सोमवार’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश आहे, असा विश्वास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.
Retail inflation rate : मे महिन्यात किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर
नवी दिल्ली : देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहक किंमत निर्देशांकावर ...
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू तारांगण येथे मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत शुक्रवारी १२ जून २०२६ आयोजित बैठक व गुणगौरव समारंभात महापौर रितू तावडे बोलत होत्या. गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार
मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे ...
उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती सदस्य वर्षा टेंबुलकर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत
अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल--मंत्री नरहरी ...
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत 'सायन्स सोमवार' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलतांना महापौर तावडे यांनी 'मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम' च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळांतील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणिताचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपकमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत.
Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना
एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींसोबत ...
महापौर तावडे पुढे म्हणाल्या की, 'गणित गुरुवार' या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून 'सायन्स सोमवार' हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुलं घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही यावेळी महापौर तावडे यांनी सांगितले.
Petrol Disel Price : राज्यातील पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर नवे निर्बंध
औद्योगिक ग्राहकांकडून पंपांवर गर्दी;साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना
मुंबई : इराण-अमेरिका-इस्त्राईल युद्धामुळे वैश्विक इंधन पुरवठा ...
गणित गुरुवार उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शालेय अभ्यास करून ही मुले मोबाईलच्या माध्यमातून गणिताचा सराव करीत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या अनेक वाटा त्यांच्यासाठी खुल्या होणार आहेत. यावेळी उपमहापौर घाडी यांनी ‘विज्ञान शाप की वरदान’ या निबंधाची आठवण करून देत उपमहापौर संजय घाडी यांनी विज्ञानाचा सकारात्मक वापर करण्यास सांगितले.
शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रम राबविल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांसह पालकांचाही तितकाच वाटा आहे. गणित गुरुवार, सायन्स सोमवारप्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन यांनी खान अकॅडमीचा जागतिक स्तरावरील शैक्षणिक प्रवास उलगडून दाखविला. शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान यांनी डिजिटल शिक्षणाबाबत माहिती दिली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रास्ताविकात गणित गुरुवार या संकल्पनेबाबत माहिती दिली. तसेच येत्या शैक्षणिक वर्षातही गणित गुरुवार उपक्रम राबविण्यात येणार आहे असे सांगितले. शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.