मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर नोएडा येथून तब्बल ४.७९८ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहे. या अमली पदार्थाची एकूण अंदाजे किंमत ९ कोटी ४८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत एका पुरुषासह दोन परदेशी महिलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या ...
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटला संशयित व्यक्तीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने अनंत कानेकर मार्ग परिसरातील अंबर हॉटेलजवळ सापळा रचला. महाराष्ट्र शासनाच्या बृहन्मुंबई दूध योजनेच्या टपरीजवळ संशयितावर नजर ठेवण्यात आली. संशयित मेथॅम्फेटामाइन विक्रीच्या उद्देशाने मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ हजार ५० ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या साठ्याची अंदाजे किंमत ४ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर ( Nashik City Police ) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार ...
चौकशीदरम्यान आरोपीने हा अमली पदार्थ ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथील एका कारखान्यातून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी ग्रेटर नोएडामध्येही पुढील कारवाई केली. ग्रेटर नोएडा येथे केलेल्या कारवाईत आणखी २ हजार ७४८ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ५ कोटी ४८ लाख रुपये आहे. याशिवाय मेथॅम्फेटामाइन तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
Shirdi : शिर्डीतील साईबाबा आणि साईबाबा संस्थानविरोधात सोशल मीडिया आणि यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या बदनामीकारक तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या ...
अशा प्रकारे मुंबई आणि ग्रेटर नोएडा येथील कारवाईत एकूण ४ हजार ७९८ ग्रॅम म्हणजेच सुमारे ४.८ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले असून, त्याची एकत्रित किंमत सुमारे ९ कोटी ४८ लाख रुपये आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अमली पदार्थांच्या पुरवठ्याची साखळी आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.






