नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी यांना त्यांच्याविरोधातील उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाला आव्हान देण्यासोबतच, हे संपूर्ण प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग करावे, अशी स्वतंत्र मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.
नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’ लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय अन्न ...
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांनी राहुल गांधींकडे घोषित उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने मे महिन्यात सीबीआय आणि ईडीला आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र असंतोष व्यक्त केला होता, तर ईडीने योग्य ती पावले उचलल्याचे मान्य केले होते. या प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी ७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवर १७ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवण्याबाबत आणि खटला दिल्ली उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





