- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे रूपडे बदलण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलची निर्मिती करण्यात येणार आहे. या लोकलची पहिली मालिका २०२७ मध्ये मुंबईत दाखल होईल. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत म्हणजे २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल आधुनिक, स्वच्छ आणि वातानुकूलित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी दिली. (New AC Local)
वरळी डोम येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुंबईची लोकल सेवा मेट्रोच्या धर्तीवर आधुनिक आणि एसी करण्याचा निर्णय आधीच झाला होता. मात्र, ज्या गतीने काम सुरू होते, त्या गतीने २०३० पर्यंत अपेक्षित बदल करणे शक्य झाले नसते. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnaw) यांच्यासोबत बैठक घेऊन या कामाला वेग देण्याची विनंती केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशातील तीन आधुनिक रेल्वे कोच कारखान्यांमध्ये या लोकलच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी उत्पादन करण्याऐवजी तीन कारखान्यांमध्ये काम विभागले जाणार असून, लोकलच्या निर्मितीला वेग मिळणार आहे. (New AC Local)
मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने दोन ...
या लोकलची पहिली मालिका २०२७ मध्ये मुंबईत येईल. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत मुंबईतील लोकल सेवा मेट्रोसारखी आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि वातानुकूलित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलच्या खरेदीला यापूर्वीच केंद्राची मंजुरी मिळाली होती. या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुविधा असणार आहेत. (New AC Local)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ...
एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा पडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “एसी झाल्यानंतर सेकंड क्लासचे तिकीट वाढवण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकर अनेकदा म्हणायचे की मेट्रोच्या सेवा आधुनिक झाल्या, मात्र लोकलचे काय? जुन्या ट्रेन कधी बदलणार? आता ही खंत दूर होणार आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. (New AC Local)
View this post on Instagram




