क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार उद्या, १२ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. तब्बल २४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १२ संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार असून, एकूण ३३ सामन्यांची मोठी मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे.
MUMBAI : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा 'द्रविड' आडनावाचा दबदबा पाहायला मिळणार आहे. भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा १७ ...
भारतीय संघाची जोरदार तयारी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघ आपले सर्व साखळी सामने संध्याकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळणार आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
भारताचे साखळी सामने (IST)
| तारीख | सामना | ठिकाण | वेळ |
| १४ जून २०२६ | भारत विरुद्ध पाकिस्तान | बर्मिंगहॅम | सायं. ७:०० |
| १७ जून २०२६ | भारत विरुद्ध नेदरलँड्स | लीड्स | सायं. ७:०० |
| २१ जून २०२६ | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | मँचेस्टर | सायं. ७:०० |
| २५ जून २०२६ | भारत विरुद्ध बांगलादेश | मँचेस्टर | सायं. ७:०० |
| २८ जून २०२६ | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | लॉर्ड्स, लंडन | सायं. ७:०० |
लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या नाईटक्लब वादानंतर आता इंग्लंड बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान ...
उपांत्य आणि अंतिम सामना स्पर्धेचे दोन्ही उपांत्य सामने ३० जून आणि २ जुलै रोजी 'द ओव्हल' (लंडन) मैदानावर खेळवले जाणार आहेत. त्यानंतर, क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या 'लॉर्ड्स' मैदानावर ५ जुलै रोजी या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच अमेरिका, कॅनडा आणि ...
सामने कुठे आणि कसे पाहाल? ही स्पर्धा देशाबाहेर होत असली तरी, भारतीय चाहत्यांना सामन्यांचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे.
-
टीव्ही प्रसारण: सर्व सामने 'स्टार स्पोर्ट्स' (Star Sports) नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.
-
लाईव्ह स्ट्रीमिंग: मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामने पाहण्यासाठी 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध असतील.
यंदाच्या विश्वचषकात सात वेगवेगळ्या मैदानांवर खेळाचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारताचे हे 'मिशन वर्ल्ड कप' यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




