MUMBAI : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा 'द्रविड' आडनावाचा दबदबा पाहायला मिळणार आहे. भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा १७ वर्षीय मुलगा, अन्वय द्रविड याची भारताच्या १९ वर्षांखालील (U19) संघात निवड करण्यात आली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) अधिकृत संघाची घोषणा केली असून, या निवडीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना ...
सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ
अन्वय द्रविडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. विनू मांकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना त्याने आपली छाप पाडली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने अत्यंत दबावाच्या परिस्थितीत हिमाचल प्रदेशविरुद्ध ८२ धावांची नाबाद 'मॅच विनिंग' खेळी साकारली होती. त्याआधी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या पहिल्या शतकासह गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली होती.
लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या नाईटक्लब वादानंतर आता इंग्लंड बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान ...
श्रीलंका दौरा: असे आहे वेळापत्रक आणि संघ
भारतीय १९ वर्षांखालील संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ४ जुलै २०२६ रोजी हंबनटोटा येथे होणार असून, यामध्ये तीन वन-डे आणि दोन चार दिवसीय (Multi-day) सामने खेळवले जाणार आहेत.
निवड समितीने जाहीर केलेले संघ खालीलप्रमाणे आहेत:
-
वन-डे (One-Day) संघ: यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, विनीथ व्ही के., अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल, अन्वय द्रविड, अनमोलजीत सिंग, वुतकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शविन व्ही, काव्य परेश पटेल, मोहीत उलवा आणि इशान सूद.
-
चार दिवसीय (Multi-day) संघ: यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, पटेल कुश, मनल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा, आर्यन सकपाळ, एच. जे., किशोर, रोहित यादव, काव्य पटेल, प्रियांशू सिंग, प्रणव राघवेंद्र आणि चिंगुरुपती वेंकटा.
Simhastha Kumbh Mela 2027 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी ...
भारतीय क्रिकेटसाठी नवी आशा
राहुल द्रविडचा वारसा अन्वय पुढे नेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यशवर्धन सिंग चौहानच्या नेतृत्वाखालील हा तरुण संघ श्रीलंकेच्या भूमीवर भारताची मान उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्वयच्या या निवडीमुळे भारतीय क्रिकेटच्या 'नेक्स्ट जनरेशन'मध्ये एक आश्वासक चेहरा समोर आला आहे.





