लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या नाईटक्लब वादानंतर आता इंग्लंड बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन याच्यांवर कठोर कारवाई केली आहे. या दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बेन स्टोक्सचे कर्णधारपद काढण्यात आले आहे.न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांचा समावेश करण्यात आलेला नाही.त्यांच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज जो रूट याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. दुसरा कसोटी सामना १७ ते २१ जून दरम्यान खेळला जाणार आहे.
NEW DELHI : भारतीय खेळाडूंची जागतिक स्तरावरील कामगिरी आणि देशातील क्रीडा संस्कृतीचा वाढता विस्तार, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाचा वर्षाव केला ...
इंग्लंड बोर्डाची कठोर कारवाई !
ईसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईटक्लबमध्ये घडलेल्या वादाच्या चौकशीमुळे स्टोक्स आणि अॅटकिन्सन या दोघंना संघातून बाहेर करण्यात आले आहे.चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज जॉर्डन कॉक्स यांना संघात संधी देण्यात आली आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
माध्यमांच्या वृत्तानुसार, लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडवर ११५ धावांनी विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन एका नाईटक्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एका रग्बी खेळाडू आणि त्याच्या सहकाऱ्यांशी वाद झाला. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर, ईसीबीने शिस्तभंग आणि सांघिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. आता दोन्ही खेळाडूंना संघातून काढून टाकण्यात आले आहे.
मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच अमेरिका, कॅनडा आणि ...
स्टोक्सच्या भविष्यबाबत चर्चांना उधाण
काही इंग्लिश माध्यमांच्या वृत्तानुसार, या वादानंतर बेन स्टोक्स कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचाही विचार करू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र याबाबत स्टोक्स किंवा ईसीबीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.




