नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक लक्षवेधी घटना घडली आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे एक महत्त्वाची बैठ सुरू होती. ही बैठक सुरू असताना अचानक सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही खासदार तिथून बाहेर पडले. आपापसांत बोलत दोघे महाराष्ट्र सदनाच्या बाहेर आले आणि तिथून एकाच कारमधून निघून गेले. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नवी दिल्ली : लोकसभेत तीव्र गदारोळ आणि आक्षेपांनंतर केंद्र सरकारने ‘परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, २०२६’ संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा ...
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य आहेत तर विनोद तावडे हे भाजपचे सदस्य आहेत. दोन्ही खासदारांचे दिल्लीतील राजकीय वर्तुळात महत्त्वाचे स्थान आहे. दीर्घ काळ सार्वजनिक जीवनात असल्यामुळे दोन्ही नेत्यांना राजकीय वर्तुळात सन्मानाने वागवले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सुप्रिया सुळेंचा प्रभाव असतो तर राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे भाजपच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये विनोद तावडे सहभागी असतात. याच कारणामुळे सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच कारमधून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि उलटसुलट चर्चा सुरू झाली.
नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भाजपशी वाढत असलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकत्र कारमधून प्रवास केल्याचा व्हिडीओ आल्यावर तर पवार सत्तेसोबत जाणार असल्याच्या चर्चेने जोर पकला आहे.
मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने ...
एकीकडे ही चर्चा असतानाच दुसरीकडे लोकसभा पुनर्रचना विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला भक्कम पाठिंबा मिळवण्यासाठी मागील काही दिवसांपासून भाजप एनडीएतील घटक पक्षांसोबतच इतर अनेक पक्षांच्याही संपर्कात आहे. यामुळे त्याच विषयाशी संबंधित चर्चेसाठी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी कारमधून एकत्र प्रवास केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
View this post on Instagram






