Nashik News : नाशिकमध्ये म्हाडाच्या (MHADA) घरावर डल्ला मारण्यासाठी बनावट कागदपत्रांचा (Forged documents) थरार उघड झाला आहे. मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर, खोटी ओळख आणि बनावट मतदान ओळखपत्राच्या आधारे म्हाडाची सदनिका बळकावल्याचा धक्कादायक प्रकार सातपूर (Satpur) परिसरात समोर आला आहे. या प्रकरणामुळे शासकीय पडताळणी प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सातपूर परिसरात म्हाडा घर घोटाळा
नाशिकच्या सातपूर परिसरात म्हाडा घर घोटाळ्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका म्हाडा सदनिकेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात (Satpur Police Station) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News )
Ashok Kharat : नाशिकमधील ( Nashik ) .भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची अंधश्रद्धेच्या नावाखाली कथित फसवणूक करणाऱ्या अशोक ...
प्रकरणातील संशयितांमध्ये कोण कोण ?
या प्रकरणातील संशयितांमध्ये राजू बडगुजर, आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मृत वडिलांच्या नावाने खोटे मतदान ओळखपत्र तयार करण्यात आले. याच बनावट ओळखपत्राचा आधार घेत म्हाडा घर हस्तांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, संशयितांनी केवळ कागदपत्रे बनावट तयार केली नाहीत, तर शासनाची दिशाभूल करण्यासाठी खोट्या नोंदी आणि चुकीची माहिती सादर करत संपूर्ण व्यवहार वैध असल्याचा आभास निर्माण केला. त्यामुळे आता म्हाडा आणि संबंधित शासकीय विभागांच्या पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसा (H-1B Visa) धोरणाबाबत मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. बोस्टनमधील फेडरल न्यायालयाने नव्या H-1B व्हिसा ...
आठ दिवसांतील दुसरा गुन्हा
विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित राजू बडगुजर याच्याविरोधातील हा गेल्या आठ दिवसांतील दुसरा गुन्हा असून आतापर्यंतचा तिसरा गुन्हा असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच जळगावमधील (Jalgaon) एका व्यावसायिकाला स्वस्तात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. त्या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर यापूर्वी आडगाव पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सातपूर, गंगापूर आणि आडगाव या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये समोर आलेल्या प्रकरणांमुळे नाशिकमध्ये कथित प्लॉटमाफिया आणि बनावट मालमत्ता व्यवहारांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करत आहेत.
Nashik : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतून मिळणारी नवी कोरी पुस्तके समोर येतात. पण नाशिकच्या शाळांना यंदा पुस्तके मिळण्याचे गणित जरा अवघड दिसतंय. ...
पोलिसांचे आवाहन
बोगस प्लॉट किंवा घर खरेदी-विक्रीसंदर्भात कोणालाही माहिती किंवा तक्रार असल्यास त्यांनी सातपूर पोलिसांशी (Satpur Police) तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






