Tuesday, June 9, 2026

Thane Accident : बदलापूरमध्ये पदाधिकाऱ्याच्या दुचाकीला कारची धडक; घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Thane Accident : बदलापूरमध्ये पदाधिकाऱ्याच्या दुचाकीला कारची धडक; घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरमध्ये मनसे (MNS) पदाधिकारी राजेश शेटे (Rajesh Shete) यांच्या दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात शेटे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Thane Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बदलापूरच्या पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. राजेश शेटे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर शेटे रस्त्यावर फेकले गेले.

अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहनचालकांनी आणि नागरिकांनी तातडीने मदत करत शेटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेटे यांची दुचाकी राँग साईडने येत असल्याचे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपघात नेमका कसा झाला आणि त्यामागे इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >