Monday, April 20, 2026

Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार

Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग एफ दक्षिण विभागात दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार आहे. ही कार्यवाही बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरूवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरु राहणार आहे. परिणामी, ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्या परिसरात असेल कपात ?

‘ए’ विभाग - पी.डि'मेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड

‘बी’ विभाग - उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. व्ही. पी., शायदा मार्ग, फ्लँक रोड नवरोजी हिल, टंडेल (उ), निशाणपाडा स्ट्रीट

टँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोंटाड, खडक, इस्तायल मोहल्ला, धोबी मार्ग, शेरिफ देवजी, व्ही. व्ही. चंदन, दरियास्थान, काजी सय्यद, सय्यद मुखरी, इस्साजी, नृसिंहनाथ, जंजीकार, रघुनाथ महाराज, जुना बंगालीपुरा, भंडारी, अभयचंद गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. रोड), निशाणपाडा, मशिद बंदर.

इमामवाडा, आय. आर. मार्ग, मोहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीट

नंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी.डिमेलो मार्ग, वाडीबंदर

रेल्वे परिसर , मुंबई बंदर परिसर

सी’ विभाग - बॅनियन स्ट्रीट, इस्माईल कर्टे रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीट

ई’ विभाग - १. नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, पाईस रस्ता, मुसा किल्लेदार रस्ता, सोफिया जुबेर मार्ग, डिमटिमकार मार्ग, एम. ए. मार्ग, टँकपाखाडी मार्ग, क्लिअर रोड, बी. जे. मार्ग, के. के. रोड

डिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरूद्दीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, टँक रस्ता, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रस्ता

म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबिट मार्ग, ताडवाडी, रेल्वे संकुल, शिवदास चापसी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३५ ते ८.१५ वा.)

एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी रस्ता, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा

दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग

माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा विठोबा मार्ग, ब्रह्मदेव खोद मार्ग, दरगाह गली, बॅ. नाथ पै मार्ग, दिलीमा स्ट्रीट, रुग्णालय गल्ली, चर्च लेन, बेकर्स लेन, नवाब टँक पूल, गन पावडर मार्ग, नवा नगर, डॉकयार्ड रोड

हाथीबाग जागा, शेठ मोतिशाह गल्ली

मुंबई बंदर क्षेत्र

जे. जे. रुग्णालय

रामभाऊ भोगले मार्ग, फरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, शेठ मोतिशाह गल्ली, टी. बी. कदम मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. मस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियल वाडी, संत सावता मार्ग, चंपी भिमजी मार्ग, ए. जी. पवार गल्ली, वीर तानाजी मालुसरे मार्ग

बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कंपाउंड, अँटलस मिल कंपाउंड, घोडपदेव क्षेत्र

शिवदास चापशी मार्ग

दारूखाना, लाकूड बंदर, कोळसा बंदर, दरगाह गली, क्वे स्ट्रीट

कस्तुरबा रुग्णालय नायर रुग्णालय

‘एफ दक्षिण’ विभाग - अभ्युदय नगर , शिवडी, वडाळा (पूर्व) , डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंग

लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली

दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इन्स्टिट्यूट गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (काही भागात)

आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा,मुंबई बंदर परिक्षेत्र

परशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी

के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेरबाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >