Saturday, August 22, 2026

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी)

मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल अंतर्गत भाईंदर केशवसृष्टी येथे शैक्षणिक सहलआयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ३० हजार ७०० विद्यार्थ्यांना या सहलीचा आनंद घेता येणार आहे. तर महापालिका शाळांमधील आठवीच्या मुलांची सहल नेहरु तारांगण येथे आयोजित करण्यात येत असून याला आधीच मान्यता देण्यात आली आहे. तर आता सातवीच्या मुलांची सहल भाईंदर येथील केशवसृष्टी येथे जाणार आहे. (BMC School Educational Trip)

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येतात. यंदा महापालिका शाळांमधील सर्व मंडळांच्या इयत्ता सातवीच्या मुलांची सहल केशव सृष्टी येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. केशवसृष्टी ही एक बहुमुखी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक संस्था आहे. हे ठिकाणी ठाणे जवळील उत्तन-भाईंदर या भागात निसर्गरम्य ठिकाणी आहे. (BMC School Educational Trip)

मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिकच्या शाळांमधील इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल अंतर्गत केशव सृष्टी, भाईदर, ठाणे' येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार ३०,७१४ एवढ्या अंदाजित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ही सहल आयोजित करण्यात आली आहे. सन २०२६-२७ या वर्षात प्रत्येक महिन्याच्या उपलब्ध सोमवार ते शनिवार या दिवसांमध्येच परिमंडळनिहाय करण्यात आलेल्या नियोजनानुसार माहे ऑक्टोंबर २०२६ पासून ते माहे फेब्रुवारी २०२७ पर्यंत (सार्वजनिक सुट्टया तसेच परीक्षांचा कालावधी वगळून) एक दिवसीय सहलींचे आयोजन करावे. आवश्यकता भासल्यास सहलीचा कालावधी दिवसांमध्ये बदल करण्याबाबतचे परिपत्रक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर निर्गमित करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC School Educational Trip)

पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल " अंतर्गत केशव सृष्टी, भाईदर, ठाणे येथे शैक्षणिक सहल २०२६-२७ आयोजित करण्याच्या कामाकरीता 'केशव सृष्टी' यांच्या समवेत प्रति विद्यार्थी करता ८०२ रुपये अदा केले जाणार आहे. यामध्ये प्राथमिक विभागाच्या इयत्ता ७ वी च्या ३०३०२ अंदाजित विद्यार्थी व माध्यमिक विभागाच्या इयत्ता ७ वीचे अंदाजित ४१२ विद्यार्थी यासाठी एकूण रक्कम २.४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC School Educational Trip)

केशवसृष्टीत मुलांना काय पाहता येणार..

केशवसृष्टी हा परिसर हिरवागार आणि शांत असून, येथे विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आणि फुलझरे आहेत. येथे सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय (विशेषतः गोपालन), आणि मधमाशी पालन यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.

ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी येथे विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. या कॅम्पसमध्ये शालेय सहल, निसर्ग शिबिरे, आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक जीवनशैली शिकण्याची ही उत्तम जागा आहे. (BMC School Educational Trip)

हिरवेगार डोंगर आणि वाहत्या नाल्यांच्या सान्निध्यात असलेला हा परिसर २०० एकरांपेक्षा जास्त भागात पसरलेला आहे येथे ३१०० हून अधिक प्रजातींची झाडे आहेत, ज्यामध्ये साग, पाम, अर्जुन, जांभूळ, कदंब आणि बांबू यांचा समावेश आहे.

आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी आणि संशोधनासाठी अनेक हर्बल वनस्पतींचे संवर्धन केले जाते. संस्थेने 'महा सूर्यकुंभ' (सोलर कुकिंग) उपक्रमात सहभाग नोंदवून जागतिक विक्रम (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला आहे.

पर्यावरण भ्रमण, कचरा व्यवस्थापन, किचनवेस्ट बायोगॅस, गोबर गॅस, गांडुळ खत निर्मिती, पेपर रिसायकलिंग ( हँड पेपर बनविणे), प्लास्टीक रिसायकल, जलव्यवस्थापन, सौरव्यवस्थापन, सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, पर्यावरण संतुलन आणि जैवविविधता या विषयांचा अंतर्भाव आहे. (BMC School Educational Trip)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >