Saturday, August 22, 2026

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन सुविधा. अनेकदा तिकीट बुक केल्यानंतर प्रवासाच्या काही वेळ आधी प्रवाशांच्या मोबाईलवर क्लास किंवा कोच अपग्रेड झाल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना तिकीट आपोआप कसे बदलले, असा प्रश्न पडतो. (Indian Railway)

मात्र, यासाठी तिकीट बुक करताना एक महत्त्वाची सेटिंग करावी लागते. विशेष म्हणजे, तिकीट अपग्रेड झाल्यास अतिरिक्त पैसे भरावे लागत नाहीत.

‘Consider for Auto Upgradation’ पर्याय महत्त्वाचा :

तिकीट बुक करताना ‘Consider for Auto Upgradation’ हा पर्याय निवडल्यास तुमचे तिकीट रेल्वेच्या नियमांनुसार अपग्रेड होण्याची शक्यता असते. बुक केलेल्या श्रेणीपेक्षा वरच्या श्रेणीमध्ये जागा उपलब्ध असल्यास रेल्वे तुमचे तिकीट अपग्रेड करू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही स्लीपर क्लासचे तिकीट बुक केले आणि ऑटो-अपग्रेडेशनसाठी पात्र ठरलात, तर उपलब्धतेनुसार तुम्हाला 3ACमध्ये जागा मिळू शकते. त्यासाठी वेगळे पैसे आकारले जात नाहीत. (Indian Railway)

3AC तिकीट थेट 2ACमध्येही होऊ शकते :

तुम्ही 3ACचे तिकीट बुक केले असून ऑटो-अपग्रेडेशनचा पर्याय निवडला असेल, तर उपलब्धतेनुसार तुमचे तिकीट 2ACमध्ये अपग्रेड होऊ शकते. म्हणजेच, कमी श्रेणीचे तिकीट बुक करून अधिक आरामदायी श्रेणीत प्रवास करण्याची संधी मिळू शकते. मात्र, ऑटो-अपग्रेडेशनचा अर्थ तिकीट डाउनग्रेड होणे असा नाही. म्हणजेच, तुम्ही बुक केलेल्या श्रेणीपेक्षा खालच्या श्रेणीत तुम्हाला पाठवले जात नाही. (Indian Railway)

तिकीट बुक करतानाच पर्याय निवडा :

रेल्वेकडून प्रत्येक तिकीट आपोआप अपग्रेड केले जात नाही. प्रवाशाने तिकीट बुक करताना ‘Consider for Auto Upgradation’ हा पर्याय निवडणे आवश्यक असते. त्यानंतर उपलब्ध जागा आणि रेल्वेच्या लागू नियमांनुसार अपग्रेडेशन केले जाऊ शकते. (Indian Railway)

कोच रद्द झाल्यास काय होते?

काही कारणांमुळे ट्रेनमधील एखादा कोच रद्द झाला किंवा बुक केलेली श्रेणी उपलब्ध राहिली नाही, तर रेल्वेकडून प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाते. अशा परिस्थितीत प्रवाशांना उपलब्धतेनुसार दुसऱ्या कोचमध्ये जागा देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वेचे तिकीट बुक करताना ‘Consider for Auto Upgradation’ हा पर्याय तपासणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, अपग्रेडेशन हे जागेची उपलब्धता आणि रेल्वेच्या नियमांवर अवलंबून असते. (Indian Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >