Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीसेन्सेक्स कोसळला, शेअर बाजार गडगडला

सेन्सेक्स कोसळला, शेअर बाजार गडगडला

मुंबई : दोन दिवसाच्या तेजीनंतर शेअर बाजारातील तेजीला मोठा ब्रेक लागला आहे. बुधवारी पहिल्या सत्रापासून शेअर बाजार गडगडला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स २२४ अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये बुधवारी ०.३७ टक्क्यांची घसरण होऊन तो ६०,३४६ अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये ०.३७ टक्क्यांची घसरण होऊन तो १८,००३ अंकांवर स्थिरावला आहे.

शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात मोठी तेजी दिसून आली होती. पण आज पहिल्या सत्रापासूनच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावर झाला आहे. पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये जवळजवळ एक हजार अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी २९८ अंकांची मोठी घसरण झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -