Monday, May 6, 2024
Homeकोकणरायगडoutdoor sports : रायगडमध्ये मैदानी खेळांमुळे बहरल्या शाळा

outdoor sports : रायगडमध्ये मैदानी खेळांमुळे बहरल्या शाळा

मोबाइलवर रमणारी मुले झाली खेळात मग्न

अलिबाग (प्रतिनिधी) : कोरोनामुळे दोन वर्षं सर्व शाळांसह महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अनेक पाल्यांनी घरातूनच अभ्यास केला. यामुळे अनेकांना प्रकृतीचे आजार बळावले. तर मोबाइल आणि लॅपटॉपवर सातत्याने अभ्यास केल्याने काहींना डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ (outdoor sports) खेळण्याचा सल्ला दिला होता. आता मात्र शाळा पुन्हा चालू झाल्याने सदरची कसर विद्यार्थी मैदानी खेळ खेळून भरून काढताना दिसत आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात अनेक शाळा मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करत असल्याने मैदाने भरून गेले आहे.

मार्च २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. शाळा बंद ठेवल्याने अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांनादेखील ब्रेक लागला होता; परंतु जून २०२२ पासून शाळा पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. दिवाळीनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यासह मुरूड, रोहा आदी ठिकाणी स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांकडून जोरदार सराव सुरू केला आहे. अलिबाग तालुका क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जेएसएम महाविद्यालयात नुकताच झाला.

१८ नोव्हेंबरपर्यंत या क्रीडा स्पर्धा होणार आहे. हॉलिबॉल, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुद्धिबळ अशा अनेक सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तसेच सांघिक अॅथलेटिक्स, स्वीमिंग आदी खेळाचे प्रकारही असणार आहेत. १४ ते १९ वयोगटातील मुले, मुलींच्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याने जिल्ह्यातील शाळा मैदानी खेळांनी बहरू लागले आहेत. एक वेगळा उत्साह व आनंद विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. विजय मिळवण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील खेळाडू शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मोबाइलमध्ये रमणारी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धांमुळे मैदानी खेळात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -