Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीजागतिक हेरीटेजदिनी जंजिरा किल्यात विनामुल्य प्रवेश

जागतिक हेरीटेजदिनी जंजिरा किल्यात विनामुल्य प्रवेश

पर्यटकवाढीसाठी पुरातत्व विभागाचा स्तुत्य उपक्रम

मुरूड : जागतिक हेरीटेज दिवस (World Heritage Day) १८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जंजिरा किल्ला (Janjira Fort) पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे प्रवेश मोफत दिला जातो. पर्यटक वाढीसाठी व पर्यटकांना गड, दुर्ग किल्ल्यांची ओळख व्हावी यासाठी पुरातत्व विभागातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो.

पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल या दिवशी, ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे [UNESCO] साजरा केला होता.

लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जपण्यास प्रेरणा देणे असा या दिवसाचा हेतू आहे.

१९८३ सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा वर्ष २०२४ ची थीम ही ‘व्हेनिस चार्टरच्या दृष्टीतून आपत्ती आणि संघर्ष’ [Disasters & Conflicts Through the Lens of the Venice Charter] अशी ठेवण्यात आली आहे.

मुरूड -राजपुरी येथील ऐतिहासिक नबाबकालिन प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे ओळख व्हावी व त्याचे महत्त्व समजावे म्हणून पुरातत्व विभागातर्फे हा दिवस जागतिक हेरीटेज डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवशी जंजिरा किल्ला प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -