Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीKotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची कारवाई

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची कारवाई

ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर लादले निर्बंध

मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, केंद्रीय बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. आता २०२२ आणि २०२३ च्या आयटी तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

सलग दोन वर्षे, बँकेने आयटी सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही आणि या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितल्यानंतरही, बँकेने चांगले काम केले नाही. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. मात्र, जे आधीच बँकेचे ग्राहक आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा मिळत राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -