Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीPension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील...

Pension Scheme: या सरकारी पेन्शन योजनेत गुंतवा पैसे, म्हातारपणी दर महिन्याला मिळतील १० हजार रूपये

मुंबई: जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आपले जीवन टेन्शनशिवाय घालवायचे आहे तर या सरकारी पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही पैसे गुंतवून वयाच्या ६० वर्षांनंतर गॅरंटेड पैसे मिळवू शकता.

तुमचे म्हातारपण सुरक्षित बनवण्यासाठी भारत सरकारच्या शानदार पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.

नुकतीच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अटल पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अर्थ मंत्री म्हणाल्या की योजनेंतर्गत कमीत कमी ८ टक्के रिटर्न मिळत आहे.

अटल पेन्शन योजना एक अशी योजना आहे जी मध्यम वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ७ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.

या स्कीमची सुरूवात ९ मे २०१५ला झाली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ हजार रूपयांपासून ते ५ हजार रूपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या राशीवर अवलंबून असते.

या स्कीमअंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदाराला वयाच्या ६०नंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ उचलण्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ ते ४० दरम्यान असले पाहिजे. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिन्याला २०१ रूपये गुंतवता तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

जर पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करत असतील तर वयाच्या ६० वर्षानंतर दोघांना एकूण १० हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -