Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNo entry in Irshalwadi : इर्शाळगडावरील परिस्थिती पाहायला जाणं तुम्हाला चांगलंच महागात...

No entry in Irshalwadi : इर्शाळगडावरील परिस्थिती पाहायला जाणं तुम्हाला चांगलंच महागात पडेल, कारण प्रशासनाने उचललं ‘हे’ कठोर पाऊल

का घेण्यात आला हा निर्णय ?

रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. असे असले तरी काही मदतीसाठी न बोलावता गडावर येणारे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ट्रेकर्स यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. इर्शाळगड हा एक प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असल्याने काहीजण केवळ कुतूहलापोटी इर्शाळगडावर जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मदतकार्यात नेमलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना गडावर जाण्यास रविवार २३ जुलैपासून पासून पुढील पंधरा दिवस १४४ कलमाद्वारे मनाई (No entry in Irshalwadi) करण्यात आली आहे.

भूस्खलनग्रस्त भागात मृतदेहांमधून दुर्गंधी पसरली आहे, त्यानंतर इर्शालवाडी आणि नानिवली गावात कलम १४४ (Section 144) लागू करण्यात आले आहे. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी विशेष आदेश लागू केले. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर इर्शाळगडावर मदतीसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून गडावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही गर्दी होत होती. तर अनेक वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही असल्यामुळे आणखी गर्दी होत होती. त्यामुळे आता मदतकार्यात नेमलेल्या व्यक्ती व संस्थांव्यतिरिक्त इतर कोणालाही पुढील पंधरा दिवसांसाठी गडावर जाता येणार नाही, असे आदेश काढण्यात आले आहेत. १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

इर्शाळवाडीतील भीषण दरड दुर्घटनेनंतर विविध पथके तेथे कसून मदत व बचावकार्य करीत आहेत. परंतु खराब हवामान, निसरडी पायवाट, बचावकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री नेण्यासाठी नसलेल्या सुविधा या सर्वच बाबींमुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. ढिगा-यांखाली गाडल्या गेलेल्या मृत प्राण्यांची दुर्गंधी येऊ लागली आहे. अशा ब-याच आपत्त्तींचा सामना करत एनडीआरएफ (NDRF), टीडीआरएफ (TDRF) आणि इतर यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहेत. मात्र इर्शाळवाडीवर मदतीसाठी येणारे ट्रेकर्स, सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. अनेकजण निव्वळ कुतूहलापोटी डोंगरावर अवघड रस्त्यावर चढून पाहणी करण्यासाठी जात आहेत. ये-जा करणाऱ्या नागरिकांमुळे डोंगराची पायवाट अधिक निसरडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलत इतर नागरिकांना इर्शाळगडावर येण्यास बंदी घातली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -