Monday, May 6, 2024
Homeदेशस्वावलंबन संमेलनाला संबोधित करणार पंतप्रधान मोदी

स्वावलंबन संमेलनाला संबोधित करणार पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १८ जुलै रोजी संध्याकाळी ४:३० वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र नवी दिल्ली येथे एन.आय.आय.ओ अर्थात नौदल नवोन्मेश आणि स्वदेशी निर्मिती संघटनेच्या “स्वावलंबन” संमेलनाला संबोधित करणार.

आत्मनिर्भर भारत योजनेमुळे लष्करी क्षेत्रात आत्मवाविश्र्वास वाढायला मोठी मदत मिळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय नौदलात स्थनिक बनावटीच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान वापरला बळकटी देण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या‘ ‘स्प्रिंट आव्हाने’ यावर मार्गदर्शन करणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नीवो एन.आय.आय.ओ आणि लष्करी संशोधन संघटना डी.आय.ओ यांच्या सहयोगाने यावेळी भारतीय नौदलात कमीत कमी ७५ भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान किंवा लष्करी साधने समाविष्ट केले जातील. या संयुक्तिक उपक्रमाला स्प्रिंट सपोर्टिंग पोल – वाल्टिंग इन आर अॅंड डी थ्रू आयडेक्स, नीवो अँड टीडँक असे म्हटले जाणार आहे.

लष्करी क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनण्यासाठी भारतीय उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणुक करणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. या दोन (१८-१९ जुलै) दिवसाच्या परिसंवादात उद्योग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सेवा, आणि सरकारी क्षेत्रे एकत्र येऊन भारतीय नौदलात कशाप्रकारे भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आत्मसात करू शकू यावर आपले विचार मांडतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यावर देखील चर्चा करतील.

या परिसंवादात संशोधन, स्थानिक बनावटीच्या निर्मितीविषयक, विविध शस्त्रे आणि साधने, आणि विमानचालन या विषयावर विशेष सत्रे आयोजित केले जातील. या परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी हिंद महासागर क्षेत्र आणि केंद्रसरकारचे सागर सिक्यूरेटी अँड ग्रोथ फाँर आँल इन द रिजन म्हणजेच या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -