Saturday, April 27, 2024
HomeदेशNarendra Modi : ‘जी-२०’ चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रतिष्ठेची संधी

Narendra Modi : ‘जी-२०’ चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रतिष्ठेची संधी

संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीस राज्यसभेला केले संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात नव्या भारतासाठी विकासाचे नवे पर्व सुरू करण्याबरोबरच जगाची दिशा ठरवण्यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावेल. अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वरिष्ठ सभागृहात स्वागत केले.

यावेळी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांचे संसदेच्या सर्व सदस्यांच्या तसेच देशातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करून पंतप्रधानांनी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या प्रतिष्ठित पदाचा उल्लेख करत हे पद लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.

राज्यसभा अध्यक्षांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त आनंद व्यक्त केला आणि सदनाच्या सर्व सदस्यांच्या वतीने सशस्त्र दलांना अभिवादन केले. उपराष्ट्रपतींचे जवान आणि किसान यांच्याशी असलेले जवळचे संबंध त्यांनी अधोरेखित केले. आपले उपराष्ट्रपती किसान पुत्र आहेत आणि ते सैनिकी शाळेत शिकले आहेत, त्यामुळे त्यांचे जवान आणि किसान यांच्याशी जवळचे नाते आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राज्यसभेचे सभापती म्हणून कारकिर्दीची औपचारिक सुरुवात होत आहे, ही बाब अधोरेखित करून पंतप्रधान भारताला आपली जबाबदारी समजते आणि तो ती चांगल्या प्रकारे पार पाडतो, असे त्यांनी पुढे म्हटले. या महत्वाच्या कालखंडात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात देशाला मार्गदर्शन करत आहे, याकडेही पंतप्रधानांनी दिशानिर्देश केला. तसेच अत्यंत उपेक्षित समाजातून वर आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचल्याच्या बाबीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

राज्यसभेच्या सभापतींबाबत आदरपूर्वक बोलताना, पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही गोष्टीत स्वतः पुढे राहून कार्य करणे ही नेतृत्वाची खरी व्याख्या आहे आणि राज्यसभेच्या संदर्भात तर ती जास्तच महत्वाची आहे. कारण लोकशाही मूल्ये जपणारे निर्णय अधिक शास्त्रशुद्ध मार्गाने पुढे नेणे ही राज्यसभेची जबाबदारी आहे.

उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली हे सभागृह आपली परंपरा आणि प्रतिष्ठा आणखी उंचीवर घेऊन जाईल. सदनात लोकशाही मार्गाने झालेली गंभीर चर्चा लोकशाहीची जननी म्हणून असलेल्या आमच्या अभिमानाला आणखी पाठबळ देईल, असे आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

तर भाषणाचा समारोप करताना, गेल्या सत्रात माजी उपराष्ट्रपती आणि माजी अध्यक्षांनी वापरलेले वाक्प्रचार आणि खुसखुशीत कविता या सदस्यांसाठी आनंद आणि हास्याची खसखस पिकवणाऱ्या स्त्रोत ठरल्या होत्या, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -