Monday, May 6, 2024
HomeदेशBillionaires : जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर; 'या' १० शहरांमध्ये राहतात...

Billionaires : जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर; ‘या’ १० शहरांमध्ये राहतात सर्वाधिक अब्जाधीश

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता आशियातील अब्जाधीशांची (Billionaires) राजधानी बनली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२४ नुसार, मुंबईत ९२ अब्जाधीश राहतात. या बाबतीत मुंबई आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने बीजिंगला मागे टाकले आहे. देशाची राजधानी दिल्ली या यादीत ५७ अब्जाधीशांसह ९व्या क्रमांकावर आहे. आता मुंबईच्या पुढे फक्त न्यूयॉर्क आणि लंडन उरले आहेत.

मुंबईची तुलना अनेकदा दुबईशी केली जाते. मात्र या यादीत प्रगतीचे प्रतीक बनलेल्या दुबई शहराचा पहिल्या दहामध्येही समावेश नाही. तेथे फक्त २१ अब्जाधीश राहतात आणि दुबई जगात २८ व्या क्रमांकावर आहे. चीनची अधिकृत राजधानी बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत. चीनची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या शांघायमध्ये ८७ अब्जाधीश आहेत. शांघाय स्टॉक एक्स्चेंज हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टॉक मार्केट आहे. या यादीत हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतातील अब्जाधीशही या प्रवासात आपले पूर्ण योगदान देत आहेत. मुंबई हे फक्त देशातील सर्वाधिक अब्जाधीशांचे घरच नाही तर सर्वाधिक ५००० स्टार्टअपही याच शहरात आहेत. हे शहर नवीन लोकांनाही पुढे जाण्याची पूर्ण संधी देत आहे. त्या तुलनेत दुबईमध्ये केवळ ३०० स्टार्टअप्स आहेत. मुंबईचा जीडीपी अंदाजे ३१० अब्ज डॉलर्स इतका आहे.

सर्वाधिक अब्जाधीश असलेली १० शहरे…

  • न्यूयॉर्क- ११९
  • लंडन- ९७
  • मुंबई- ९२
  • बीजिंग- ९१
  • शांघाय- ८७
  • शेनझेन- ८४
  • हाँगकाँग- ६५
  • मॉस्को- ५९
  • नवी दिल्ली- ५७
  • सॅन फ्रान्सिस्को- ५२

सर्वाधिक अब्जाधीश असलेले १० देश…

  • चीन- ८१४
  • अमेरिका- ८००
  • भारत- २७१
  • ब्रिटन- १४६
  • जर्मनी- १४०
  • स्वित्झर्लंड- १०६
  • रशिया- ७६
  • इटली- ६९
  • फ्रान्स- ६८
  • ब्राझील– ६४

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -