Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीMoscow Concert Attack : इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्को हल्ल्याची जबाबदारी

Moscow Concert Attack : इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्को हल्ल्याची जबाबदारी

आतापर्तंत ८० जणांचा मृत्यू, १४५ जखमी

मॉस्को : इस्लामिक स्टेट (Islamic State) या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात मॉस्कोमधील हल्ल्याची (Moscow Concert Attack) जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने आपल्या अमाक वृत्तसंस्थेवर एक निवेदन पोस्ट करून हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

निवेदनात, या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रास्नोगोर्स्क शहरात ख्रिश्चनांच्या मोठ्या सभेवर हल्ला केला, ज्यात अनेक लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले.

रशियाच्या FSB फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचा हवाला देत बीबीसी आणि रॉयटर्सने वृत्त दिले की, शुक्रवारी रात्री मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सशस्त्र पुरुषांच्या गटाने गोळीबार केल्याने ८० हून अधिक लोक ठार झाले. तसेच या हल्ल्यात १४५ जण जखमी झाले.

मॉस्कोत कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ८० जण ठार, अनेकजण जखमी

रशियन बातम्यांनुसार, दहशतवाद्यांनी स्फोटके फेकली, ज्यामुळे मॉस्कोच्या पश्चिमेकडील क्रोकस सिटी हॉलमध्ये मोठी आग लागली. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये इमारतीवर धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत आहेत.

हल्ला करणारे दहशतवादी कोणत्या दिशेने गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ही ‘मोठी शोकांतिका’ असल्याचे म्हटले आहे. रशियाची सर्वोच्च तपास संस्था या हल्ल्याचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या हल्ल्याचे वर्णन रशियातील दोन दशकांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून केले जात आहे.

क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. रशियन रॉक बँड पिकनिकच्या कार्यक्रमासाठी जमाव जमला असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच बंदुकधारी क्राको सिटी कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी लोकांच्या जमावावर गोळीबार केला, ज्यात किमान ८० लोक ठार झाले. तसेच १४५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -