Wednesday, May 8, 2024
Homeदेशअमेरिकेत राहुल गांधीच्या दौऱ्यादरम्यान खलिस्तान्यांची मोदींनी मारण्याची धमकी

अमेरिकेत राहुल गांधीच्या दौऱ्यादरम्यान खलिस्तान्यांची मोदींनी मारण्याची धमकी

कॅलिफोर्निया: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकतील दौऱ्यादरम्यान कॅलिफोर्निया येथे झालेल्या भाषणादरम्यान खलिस्तानी झेंडे फडकवत खलिस्तानची मागणी करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अमेरिकास्थित खलिस्तानी संघटना ‘एसएफजे’ने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. ‘एसएफजे’ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने या घटनेचा व्हिडिओ जारी करत म्हटले की, १९८४ च्या शीख दंगलीत आम्ही काय केले, हे सर्वांनी पाहिलंय? राहुल गांधी अमेरिकेत कुठेही जातील. खलिस्तान समर्थक शीख तुमच्यासमोर उभे राहतील. २२ जूनला मोदींची बारी असेल.

राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. आज येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही राहुल संवाद साधणार आहेत. राहुल गांधी वॉशिंग्टन डीसीमध्ये संसद सदस्य आणि थिंक टँक यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यांच्या दौऱ्याची सांगता ४ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये जाहीर सभेने होणार आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -