Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाएआयएफएफच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे

एआयएफएफच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे

८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी खेळाडूवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी खेळाडू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारताचे माजी गोलकीपर आणि भाजप नेते कल्याण चौबे यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा पराभव केला आहे.

एआयएफएफ निवडणुकीसाठी शुक्रवारी नवी दिल्लीत मतदान झाले. या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी भुतियाविरुद्ध ३३-१ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. एआयएफएफच्या ८५ वर्षांच्या इतिहासात कल्याण चौबे यांच्या रुपात पहिल्यांदाच माजी खेळाडूची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर एनए हरिस हे उपाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळतील.

हरिस हे कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्यातील काँग्रेसचे आमदार आहेत. भारतातील ३६ राज्य फुटबॉल संघटनांपैकी ३४ संघटनांनी निवडणुकीत भाग घेतला. लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला मतदान करण्याची परवानगी नव्हती.

एआयएफएफच्या निवडणुकीमुळे भारतीय फुटबॉलमधील गेल्या काही महिन्यांतील नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम मिळाला. दरम्यान, भारतीय फुटबॉलने माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना डिसेंबर २०२० मध्ये निवडणूक न घेतल्याने पदावरून हटवण्यात आले. यानंतर प्रशासकांची समिती स्थापन करण्यात आली, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने एआयएफएफवर निलंबनाची कारवाई केली होती. एआयएफएफमध्ये ‘तिसऱ्या पक्षाचा’ हस्तक्षेप वाढला असल्याचे कारण देऊन फिफाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली होती.

पराभवानंतर बायचुंग भुतिया म्हणाला की, “मी भविष्यातही भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी काम करत राहीन. अभिनंदन कल्याण. मला आशा आहे की, तो भारतीय फुटबॉलला आणखी पुढे नेईल. मला पाठिंबा देणाऱ्या भारतीय फुटबॉल चाहत्यांचे आभार. निवडणुकीपूर्वीही मी भारतीय फुटबॉलसाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहीन. होय, मी कार्यकारी समितीचा सदस्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -