Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीIran : इराणमध्ये अंदाधुंद गोळीबार

Iran : इराणमध्ये अंदाधुंद गोळीबार

तेहरान (वृत्तसंस्था) : इराणमधील (Iran) सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरात गोळीबाराची ही घटना घडली. येथील मार्केटमध्ये हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले आणि तिथल्या जनतेवर तसेच सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यात पाच जण ठार झाले आणि किमान १० जण जखमी झाले. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

Savarkar : सावरकरांबद्दलच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक

इराणमध्ये अलीकडच्या काळात देशव्यापी निदर्शने होत आहेत. सुरक्षा दल आंदोलकांवर कारवाई करतानाही दिसत आहे. निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी इराणच्या शिराज शहरातही गोळीबाराची घटना समोर आली होती. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० जण जखमी झाले होते. येथे ३ हल्लेखोरांनी जमावावर गोळीबार केला. शिया समुदायाचे पवित्र स्थान शाह चेराग येथे ही घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निर्णय क्षमता

मदत

- Advertisment -