Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाIND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये अशी असू शकते भारताची प्लेईंग ११

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये अशी असू शकते भारताची प्लेईंग ११

मुंबई: आज म्हणजेच नव्या वर्षात २०२४मध्ये पहिल्यांदा टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरत आहे. त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचा संघ आहे. मात्र भारतीय संघ त्यांना हलक्यामध्ये घेणार नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, पहिल्या टी-२०मध्ये दोन स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाही. पहिला म्हणजे भारताचा विराट कोहली आणि दुसरा अफगाणिस्तानचा सुपरस्टार रशीद खान. कोहली दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून खेळताना दिसेल. मात्र रशीद खान संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर आहे.

२०२४ टी-२० विश्वचषकाआधी भारताची ही शेवटची टी-२- मालिका आहे. कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळानंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०२२च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता.या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आणि त्यानंतर आयपीएल २०२४चे आयोजन होईल.

टीम इंडियाच संभाव्य प्लेईंग ११ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन/जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव/रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार.

अफगानिस्तान संभाव्य प्लेईंग इलेव्हन- हज़रतुल्लाह ज़ज़ई, रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम ज़ादरान (कर्णधार), नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी, अज़मतुल्लाह उमरज़ई, मुजीब उर रहमान, कैस अहमद, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -