Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखचर्चेतली राज्ये : ईशान्येकडील पूर्वोत्तर राज्यांमध्येही चुरस

चर्चेतली राज्ये : ईशान्येकडील पूर्वोत्तर राज्यांमध्येही चुरस

वृत्तसंस्था:ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मिझोराम आणि मेघालय या राज्यांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर आसाममध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि सहा मे या तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. याशिवाय मणिपूरमध्ये १७ आणि २६ एप्रिल या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपा, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये स्पर्धा आहे. ईशान्येकडील राज्यांमधील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरामध्ये लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा आहेत.

मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये लोकसभेची प्रत्येकी एक जागा आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने येथे आघाडी घेतली आहे. ईशान्येत काँग्रेस एकाकी पडली आहे. ईशान्य हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आज येथे पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ईशान्येचे राजकारण झपाट्याने बदलले आहे. पूर्वोत्तर हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ईशान्येकडील पूर्वोत्तर राज्यांवर प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे.

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या पूर्वेला येते. भारतात सर्वात अगोदर सूर्य या राज्यात उगवतो. त्या राज्यात जनता कोणाच्या परड्यात मत टाकेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने अरुणाचल प्रदेशसाठी ६० जगांवर उमेदवार घोषित केला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्त जागेवर निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बंदी मिली, सी. सी. सिंगफो, लोवंग्च वांग्लात, मंगोल योम्सो, नॉटा याचे वर्चस्व होते. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, जनता दल पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षांमध्ये चुरस असणार आहे. पश्चिम अरुणाचलमध्ये किरेन रिजीजू हा भारतीय जनता पार्टीचा मोठा चेहरा रिंगणात आहे. तर पूर्व अरुणाचल प्रदेशातून भाजपचे तापीर रिंगणात आहेत.

सिक्कीम हे भारतातले छोटे राज्य आहे. त्याची सीमा उत्तर पूर्वेला चीनला, पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ तर दक्षिणेला पश्चिम बंगालला लागून आहे. सिक्कीम सिलीगुडी कॉरिडॉरच्या देखील जवळ आहे. हे राज्य बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. सिक्कीमला १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सिक्कीमच्या ३२ विधानसभा जागांसाठी घोषणा करण्यात आली आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये बारा जागा अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव आहेत. त्यामध्ये भूटिया, लेप्चा म्हणजेच शेरपा, लिम्बू, तामांग, नेपाली समुदायाचा समावेश आहे. सिक्कीम विधानसभेचा कार्यकाळ २ जूनला संपणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम डेमोक्रेटिक मोर्चाने १७ जागा जिंकून प्रेमसिंह तमांग मुख्यमंत्री बनले. चामलिंग यांचा पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला १५ जागा मिळाल्या. भाजपा, काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नव्हती. नागालँडमध्ये २० मार्चला मतदान होणार आहे. या राज्यात राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे चिंगवांग कोन्याक, काँग्रेसचे एस. सपोंगमेरेन जमीर आघाडीचे उमेदवार आहेत. मिझोराममध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. जोरम पीपल्स मूव्हमेंट पक्ष मैदानात उतरला आहे. एका जागेसाठी राज्यात १९ एप्रिलला मतदान आहे. मिझोराममध्ये केवळ एकच जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या राज्यात ८,६१,२७७ मतदार असून ४,१४,७७ पुरुष, तर ४,४१,५२० महिला मतदार आहेत.

मणिपूरमध्ये कुकी समुदायाच्या हजारो नागरिकांनी हिंसाचारानंतर शरणागती पत्करली आहे; मात्र ते मतदान करू शकणार नाहीत. या राज्याची स्थापना झाल्यापासून म्हणजे १९८७ पासून काँग्रेस आणि एमएनएफ पक्षाची सत्ता होती. मेघालयमध्ये काँग्रेसचे व्हिन्सेंट पाला, नॅशनल पीपल्स पार्टीचे अगाथा संगमा, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे मेटवाह लिंगडोह, भारतीय जनता पक्षाचे सणबोर शुल्लई, तसेच तृणमूल काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मोदी सरकारने दहा वर्षांच्या काळात ईशान्य भारतातील विकास निधीमध्ये अभूतपूर्व वाढ केली आहे. कारण ही राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत विकासात मागे होती. ईशान्य भारतातील नागरिकांना आपण भारतापासून वेगळे आहोत, असे वाटत होते. परिणामी, नक्षलवाद आणि बंडखोर गटांमध्ये वाढ झाली. ईशान्येकडे आदिवासी आणि ख्रिश्चनांचे प्रमाण जास्त आहे. ख्रिश्चनांवर अनेक जनजातींना आपल्या धर्मात सामवून घेतल्याचा आरोप आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकाने प्रादेशिक धोरणांना बळकटी दिली. त्यामुळे देशभरातील पर्यटकांचा आणि गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला तिथे चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -