Friday, April 26, 2024
Homeदेशओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा भीषण अपघात

ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा भीषण अपघात

१७९ जण जखमी, ३० जणांचा मृत्यू

ओडिशा: ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला जोर धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार १७९ प्रवासी जखमी तर ३० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर, एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -