Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीIllegal IPL Streaming Case : अभिनेता संजय दत्त, तमन्ना भाटीया यांना महाराष्ट्र...

Illegal IPL Streaming Case : अभिनेता संजय दत्त, तमन्ना भाटीया यांना महाराष्ट्र सायबर पोलिसांची नोटीस

२९ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आयपीएल सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग (Illegal IPL Streaming Case) प्रकरणी वादात अडकली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समजते.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने  आजवर अनेक भूमिका साकारुन एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बाहुबलीसारख्या (Bahubali) प्रचंड गाजलेल्या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र, सध्या तमन्ना एका अडचणीत सापडली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून (Cyber cell) तिला समन्स बजावण्यात आलं आहे. २०२३ चं आयपीएल (IPL 2023) ‘फेअरप्ले’वर प्रसारित केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी तिला २९ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने एक्स वर पोस्ट केल्यानंतर तमन्ना भाटिया हीस आलेल्या नोटीसबाबत माहिती पुढे आली. ”महाराष्ट्र सायबरने अभिनेत्री तमन्ना भाटियाला फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या बेकायदेशीर स्ट्रीमिंगमुळे वायाकॉमचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तिला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे”, असे वृत्तसंस्थेने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

अभिनेता संजय दत्त यालाही या संदर्भात २३ एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. २०२३ ची आयपीएल स्पर्धा अवैधरित्या ‘फेअरप्ले’ अॅपवर प्रसारित केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र संजय दत्त सायबर पोलिसांसमोर हजर झाला नव्हता. त्याऐवजी, त्याने आपला जबाब नोंदविण्यासाठी तारीख आणि वेळ बदलून मागितली होती. आपण पूर्वनियोजीत कामातील व्यग्रतेमुळे भारताबाहेर आहोत. त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी आपणास वेळ आणि तारीख बदलून मिळावी, अशी मागणी दत्त याने केल्याचे समजते.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये, Viacom18 कडून आयपीएल सामने प्रक्षेपित करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) असल्याचा दावा करून तक्रार नोंदवली. ज्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. असे असूनही, फेअर प्ले बेटिंग ॲपने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीरपणे सामने प्रवाहित करणे सुरू ठेवले. यामुळे आपलं १०० कोटींचं नुकसान झालं असल्याचा दावा ‘वायकॉम १८’ या कंपनीने केला आहे.

या प्रकरणी आता तमन्ना चौकशीला हजर राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फेअरप्ले अ‍ॅपचं प्रमोशन केल्यामुळे तमन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. या प्रकरणी एक साक्षीदार म्हणून तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी कुणी संपर्क साधला, आणि तिला यासाठी किती रुपये मिळाले, असे प्रश्न तिला विचारले जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आतापर्यंत रॅपर बादशहाचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलं आहे.

याआधीही संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिस आणि तमन्ना यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये बेटिंग ॲपच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -